Tarun Bharat

राष्ट्रपती राजवटीची सर्व कारणे राज्य सरकारने पुर्ण केली – चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्यपाल आणि सरकार यांच्यामधील वादाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुमिका स्पष्ट केली.तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी जी कारणे लागतात त्यातील एकही कारण या महाविकास आघाडी सरकारने शिल्लख ठेवले नाही. त्यामुळे राष्ट्रपती आत वाट बघत आहेत. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व गटात उमेदवारी अर्ज भरले आहेत. दोन जागा मिळवल्याशिवाय भाजप आपले उमेदवार मागे घेणार नाही. केंद्रीय मंत्री अमित शाह गेले दोन दिवस महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले होते. सहकारातील खूप कळणारा माणूस सहकार विभागाला मिळाला आहे.

कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी द्यावी. काही गेले असतील तर त्याची कारण वेगळी असतील.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील हे प्रचाराच्या पहिल्या सभेपासून सुरू होतं. त्यावेळी का विरोध केला नाही. असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर ही त्यानी यावेळी टीकास्त्र सोडले.

तसेच महाराष्ट्राच्या राजकियस्थितीवर बोलताना पाटील म्हणाले कि, कोण आजारी आहे ? कोण जेलमध्ये आहे ? राज्यात गोंधळ सुरू आहे. तसेच तपास यंत्रणा यांचा आणि भाजपचा कोणताही संबध नाही. तसेच एक दोन नव्हे तर तीन प्रकारचे पेपर फुटले. या सगळ्यांची पाळंमुळं राजकीय व्यक्तीपर्यंत पोहचत आहेत. त्यावरून सीबीआय चौकशीची मागणी आम्ही लावून धरणार आहे. असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. पेपरफुटी प्रकरणात धागेदोरे चार मंत्र्यांपर्यंत पोहचले आहेत. त्या संदर्भात ते बोलत होते.

Related Stories

मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून फीवसुली करू नका

Archana Banage

सातारा जिल्ह्याला लॉटरी लागली; शिंदे प्रभावी ठरले : शरद पवार

Abhijeet Khandekar

मुंबईतील ‘या’ २६ मशिदींमध्ये भोंग्याविना होणार पहाटेची अजान

Archana Banage

गोकुळ निवडणूक : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे उमेदवार जाहीर

Archana Banage

चक्क स्कॉर्पिओतून शेळ्यांची चोरी

Archana Banage

विहिरीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडुन मृत्यू

Archana Banage