Tarun Bharat

राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवणारी दौड

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवबानं सांगावा धाडलाय रं,

देशासाठी जगायचं रं,

असे म्हणत दौडमध्ये शिवभक्त सहभागी होतात. युवकांमध्ये देशप्रेम निर्माण करणारे शिवप्रति÷ान दौडच्या माध्यमातून युवापिढीला संस्कारीत करण्याचे काम करत आहे. फक्त धर्मसंस्कार न करता राष्ट्रभक्ती जागविण्याचे काम दौडच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे दरवषी या दौडची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. यावषी निर्बंध असले तरीही युवक देशभक्तीचे धडे गिरवत आहेत.

सहाव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडला शहापूर अंबाबाई मंदिर येथून प्रारंभ झाला. शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. वसंत सातारकर, पूनम नांदवडेकर, अर्चना पाटणेकर, सुनीता तारीहाळकर, आनंद रामलिंग यांना पूजेचा मान देण्यात आला. दुर्गादेवी, भवानीच्या नावाने गजर करत दौडला सुरुवात झाली.

नाथ पै चौकमार्गे गोवावेस येथील बसवेश्वर उद्यानात दौडची सांगता झाली. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली.

दौडमुळे युवकांवर चांगले संस्कार, राघवेंद्र हवालदार (शहापूर पोलीस निरीक्षक)

मागील 17 वर्षांपासून मी दौड पाहत आलो आहे. परंतु यावषी प्रत्यक्ष या दौडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. युवकांना या दौडमुळे चांगले संस्कार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पूजेचा मान मिळाल्याने आनंद, अर्चना पाटणेकर (शिवभक्त)

कोरोनामुळे यावषी दौडमध्ये सहभागी होता येत नसल्याने थोडा हिरमोड झाला होता. परंतु आज पूजेचा मान मिळाल्याने आनंद होत आहे. यावषीची कसर पुढील वषी भरून काढू, असे तिने सांगितले.

दौडची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो, पूनम नांदवडेकर (शिवभक्त)

दौडची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो. दौडसाठीची तयारी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. परंतु यावषी तो आनंद आम्हाला अनुभवायला मिळाला नाही. पूजेमध्ये सहभागी झाल्याचे समाधान मिळत असल्याचे तिने सांगितले.

शनिवार दि. 24 रोजीच्या दौडचा मार्ग…

ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरपासून दौडला सुरुवात होणार आहे. हेमू कलानी चौकमार्गे स्टेशनरोड येथून शनिमंदिर येथे दौडची सांगता होणार आहे. 

Related Stories

पूरग्रस्तांसाठी आलेले लोखंडी पत्रे गोदामात 9 महिन्यापासून पडून

Patil_p

कॅन्टोन्मेंटमधील लीज संपलेल्या जागांना मिळणार मुदतवाढ

Omkar B

सुपरबीइंगतर्फे १२ फेब्रुवारी रोजी ट्रायथलॉन-डुएथलॉन स्पर्धेचे आयोजन

Sandeep Gawade

लोकमान्य सोसायटीकडून ग्राहकांसाठी खूशखबर

Patil_p

बेळगाव-कोकण बससेवा ठप्पच

Amit Kulkarni

डॉ. सतीश याळगी यांचा सत्कार

Patil_p