Tarun Bharat

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर

प्रतिनिधी/पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंञी शरद पवार आज मंगळवार (दि.२९) रोजी पंढरपूर दौऱ्यावरती येणार आहेत. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, रामदास महाराज कैकाडी (जाधव) यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. शरद पवार हे तिन्ही कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

सोलापूर जिल्हयातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत यांचे काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक वर्षे काम केले आहे. पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून सुधाकरपंत परिचारक यांची ओळख होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचेही कोरोनाने निधन झाले आहे. राजूबापू पाटील यांचे वडील कै. यशवंतभाऊ पाटील यांच्यापासून पवार यांचे पाटील घरण्याशी संबंध होते. तसेच रामदास महाराज कैकाडी यांचेही कोरोनाने निधन झाले आहे. त्यांचाही पवार यांच्याशी स्नेह होता.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे आज पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. ते मंगळवारी सकाळी पुण्यातून निघणार असुन टेंभुर्णी मार्गे त्यांचे भोसे येथे दुपारी १२ च्या सुमारास आगमन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापु पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनात्मक भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता ते पंढरपूर येथील माजी आमदार सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निवासस्थानी भेट देऊन ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ह.भ.प रामदास महाराज कैकाडी (जाधव) यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून ते सांगोला रोडवरील जिल्हा न्यायालयाशेजारील आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ देणार आहेत.

Related Stories

सोलापूर : धाराशिव साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती

Archana Banage

Solapur : अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून; कोयत्याने केले 15 वार

Abhijeet Khandekar

सोलापुरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरूवात

Archana Banage

सोलापूर शहरात 47 नवे कोरोना बाधित, दोघांचा मृत्यू

Archana Banage

यंदा अक्षता सोहळा, होमहवन वेळेतच

Archana Banage

सोलापूर : लालपरी सुरू पण प्रवाशांच्या विना

Archana Banage