Tarun Bharat

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट

Advertisements

प्रतिनिधी / पंढरपूर

पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके हे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय येथे उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेतली.

या भेटीनंतर शरद पवार यांना भारत भालके यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता. ते म्हणाले की, त्यांच्या प्रकृती बाबत डॉक्टरांना विचारा असे त्यांनी सांगितले. याबाबत रुबी हॉल रूग्णालयाचे संचालक डॉ. परवेझ ग्रँट म्हणाले की, “आमदार भारत भालके यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तसेच त्यांना पोस्ट कोविडमुळे खूप त्रास होत आहे. त्यावर उपचार सुरू असून त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे. तर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. आमची टीम लक्ष ठेऊन आहे”

Related Stories

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट

datta jadhav

नूतन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील क्वारंटाईन

Abhijeet Shinde

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

Anil Deshmukh case : भाजपकडून एजन्सीचा गैरवापर – सुप्रिया सुळे

Abhijeet Shinde

सोलापूर : महसूल प्रशासनातील 128 कर्मचार्‍यांच्या बदल्या

Abhijeet Shinde

World Alzheimer’s Day 2022 : जगभरात ५० दशलक्ष लोक या आजाराचे बळी, जाणून घ्या भारताची स्थिती

Archana Banage
error: Content is protected !!