Tarun Bharat

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना कार्यालयात घुसून मारहाण

सावंतवाडी/प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा इंदिरा गांधी संकुल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक दळवी यांना त्यांच्या उभाबाजार येथील येथील पक्ष कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनसेच्या चार प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यात मनसेचे पदाधिकारी कौस्तुभ नाईक, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, सावळाराम गावडे आणि मनोज कांबळे यांचा समावेश आहे. तर आपल्यालाही मारहाण करण्यात आल्याची परस्परविरोधी तक्रार कौस्तुभ नाईक याने दिली आहे. सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांचा व्हाट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमधून ऍडमिन पुंडलिक दळवी यांनी कौस्तुभ नाईक यांना रिमुव्ह केले होते. याचाच राग मनात धरून ही मारहाणीची घटना घडली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडीत धाव घेत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले.

Related Stories

डाॅक्टर डे निमित्त रोटरीच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

Anuja Kudatarkar

सिमल्यातील सफरचंदांची पहिल्यांदाच होणार ऑनलाइन विक्री, कृषी उत्पन्न समितीचा निर्णय

Tousif Mujawar

चीनला डावलून अमेरिकेसोबत गेलात तर…

datta jadhav

मंत्री यड्रावकर शिवसेना आघाडीसोबत

Archana Banage

दांडेआडोममध्ये होणार अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला ‘रौप्य’

datta jadhav