Tarun Bharat

राष्ट्रवादीतर्फे शशिकांत शिंदे यांची उमेदवारी फायनल

आमदारकीसोबत प्रदेशाध्यक्षपदही होणार बहाल : पराभवाचा वचपा डबलबारने निघणार

प्रतिनिधी/ सातारा

पक्षातील लढवय्यांचा सन्मान कसा करावा शरद पवारांना ते चांगलेच माहिती आहे. त्यामुळे नुकत्याच होवू घातलेल्या विधान परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदेंची उमेदवारी फायनल झाली असून संख्याबळाचा विचार केल्यास आता शशिकांत शिंदेंच्या आमदारकीसाठी केवळ औपचारिकता बाकी आहे. पण त्याबरोबरच राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ आणि आक्रमक शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदीही वर्णी लावली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. असून त्यामुळे जावली तालुक्याचे सुपूत्र शशिकांत शिंदेच्या पराभवाचा वचपा राष्ट्रवादी डबलबाराने काढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत सातारच्या दोन्ही महाराजांनी केलेल्या खेळामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक निसटता पराभव झाला होता. सातारा जिह्यातील लोकसभेसह विधान सभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा आक्रमक प्रचार करणाऱया शशिकांत शिंदेंचा पराभव राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांच्या जिव्हारी लागला होता. गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रियाही खा. शरद पवार यांनी दिली होती. योग्य वेळी शशिकांत शिंदेंचे पुनर्वसन निश्चितपणे केले जाईल, असा शब्दही पवार यांनी सातारकरांना दिला होता.

विधानपरिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदेंची उमेदवारी फायनल झाली असून संख्याबळाचा विचार केल्यास आता शशिकांत शिंदेंच्या आमदारकीसाठी केवळ औपचारिकता बाकी आहे. ते आमदार होणारच, याबद्दल कोणालाही शंका नाही. मात्र राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ आणि आक्रमक शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदीही वर्णी लवकरच लावली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळत असून यामुळे जिल्हय़ातील राजकारणाची सुत्रे पुन्हा शिंदेंच्या भोवती फिरणार हे मात्र नक्की.

Related Stories

सातारा : उंब्रज येथील बॅटरीचे दुकान फोडले ; २८ बॅटरी लंपास

Archana Banage

शाहूपुरीत 2 दुकाने फोडून 12 हजारांची रोकड लांबवली

Patil_p

सातारा : गोडोलीत बिबट्याच्या तावडीतून वाचवले श्वानाचे प्राण

Archana Banage

कोरेगावचा वाघा घेवडा पोस्टाच्या तिकिटावर

datta jadhav

आज रात्री बारापासून वीज कर्मचारी 72 तासाच्या संपावर

Patil_p

आमदार शिवेंद्रराजे आणि आ.शशिकांत शिंदे एकत्र

Archana Banage