Tarun Bharat

राष्ट्रवादी ओबीसी सेल आक्रमक

प्रतिनिधी / सातारा : 

सातारा वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विजय माळी यांची म्हसवड येथे बदली केल्याने आलेल्या नैराश्येतून त्यांनी अगोदर व्हिडीओ बनवून नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून, या प्रकरणात आता राष्ट्रवादी ओबीसी सेलने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शैलेश शेवाळे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेवून या प्रकरणात माळी यांना न्याय द्यावा, अशी मागणी करत याबाबतची तक्रार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.  

पोलीस कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या चुकीच्या पद्धतीने झाल्या असल्याचा व कोणाच्या तरी दबावाखाली केल्याचा उल्लेख  पोलीस कर्मचारी विजय माळी केलेल्या व्हिडीओत आहे. त्यांनी या व्हिडीओत मी माझी जीवन यात्रा संपवत आहे, असे नमूद केलेले असून ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शैलेश शेवाळे यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करुन त्यांनी या प्रकरणात विजय माळी यांना न्याय मिळाला पाहिजे. मी या प्रकरणाचा संपूर्णपणे चौकशी केलेली आहे. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची बदली करण्यात आलेली आहे. ही बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली असून त्यांनी याबाबतची तक्रार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे करण्यात आली असल्याचे सांगितले.

Related Stories

गुंगीचा स्प्रे मारून भ्याड चोरी

Patil_p

यशवंतराव मोहितेंची भाषणे युवा पिढीने अभ्यासावीत

Patil_p

एस.टी.महामंडळाच्या वाहकास मारहाण

Amit Kulkarni

साताऱयात 500 मुस्लिम बांधवांनी केले रक्तदान

Patil_p

सातारा : जिल्ह्यातील 119 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित, दोन बाधिताचा मृत्यू

Archana Banage

कोयना धरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Patil_p