Tarun Bharat

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांच्यावर मागील 8 दिवसांपासून सिंहगड रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तथापि, उपचार घेऊनही प्रकृती सुधारणा झाली नसल्याने त्यांना रुबी हॉल क्लीनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.


रूपाली चाकणकर गेल्या 15 दिवसांपूर्वी जालना दौऱ्यावर होत्या. जालना दौऱ्यावरून पुण्यात आल्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. डेंगुची लक्षणं जाणवत असल्याने तसंच त्यांना पेशी कमी जास्त होण्याचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.


दरम्यान, चाकणकर यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली आहे. मात्र कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आता त्यांना पुढील उपचारासाठी रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

Related Stories

सोलापूर : कॉ. आण्णाभाऊ साठेंना माकप कडून विनम्र अभिवादन

Abhijeet Shinde

पंजाबच्या शेतकऱ्याला अस्वस्थ करत देशानं एकदा इंदिराजींच्या हत्येपर्यंत किंमत दिलीय – शरद पवार

Abhijeet Shinde

कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा

datta jadhav

‘काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय’

Abhijeet Shinde

”ताईसाहेब…आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र…”

Abhijeet Shinde

Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ई़़डी कोठडी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!