Tarun Bharat

राष्ट्रवादी काँग्रेस करणार लोककलावंतांच्या खात्यावर प्रत्येकी ३ हजार रुपये जमा

प्रतिनिधी / सातारा

राष्ट्रवादी काँग्रेस व वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी दुर्लक्षित लोककलावंतांसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमांतून मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असे सांगितले. त्यानुसार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा होणार आहेत.सातारा जिल्ह्यातील लोककलावंतांनी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पाऊल पुढे असून राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली आहे. प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत राज्यातील जवळपास ५ हजार भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांची नोंद झाली असून त्यांच्या बॅंक खात्यात टप्याटप्याने प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी जाहीर केले आहे.

आता राज्यातील वेगवेगळ्या भागांत फडामध्ये व अन्य ठिकाणी राहणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांची यादी, गांव आणि बॅंक खाते यांची नोंद घेण्याचे कामं सुरू आहे.सातारा जिल्हा कार्य क्षेत्रातील लोकवंतांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह आपल्या नावांची नोंद मोबाईल नंबर 9860911652, 9822281333, 7057292099यावर करावी असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, भटक्या विमुक्त जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केले आहे.

Related Stories

सातारा : कोरोनामुक्तीचा रेट ८० टक्क्यांच्या पुढे

Archana Banage

मनसेचा आज पाडवा मेळावा; राज ठाकरे काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

Abhijeet Khandekar

डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांनाही मिळणार उपाधी !

Kalyani Amanagi

मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

Archana Banage

सातारा : वाई बाजार समितीवर शेतकऱ्यांचा मोर्चा

datta jadhav

लोकराजाला कलाविष्काराने रविवारी अभिवादन

Archana Banage