Tarun Bharat

राष्ट्रवादी लढवणार पाच पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका

Advertisements

मुंबई / प्रतिनिधी

आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढवणार असून त्यासाठी विविध पक्षाबरोबर युती करण्याची तयारी देखील राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी दर्शवली आहे. शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहीती दिली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि इतर नेतेही उपस्थित होते.
उत्तरप्रदेशातील काँग्रेसचा अल्पसंख्यांक चेहरा म्हणून ओळखले दाणारे सिराज मेहंदी यांनी 13 आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांनीसुद्धा भाजपला रामराम केला. येणाऱ्या दिवसात भाजपला अजून धक्का बसेल असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

पुढे माहिती देताना शरद पवार म्हणाले की, आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एकूण तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभाग घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून उत्तरप्रदेशातील भाजपचं सरकार हटवण्याची गरज असून उत्तरप्रदेशात नागरिकांना बदल हवाय. शरद पवार म्हणाले उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच उत्तरप्रदेशात जाणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे.

मणिपूरमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार असून याबाबत काँग्रेससोबरोबर बोलणी सुरू आहे. गोव्यातही काँग्रेस पक्षासोबत आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरू असून गोव्यातसुद्धा परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Related Stories

कन्नड अभिनेता विजय संचारी यांचे निधन

Abhijeet Shinde

निर्भया प्रूरात्म्यांना ‘सर्वोच्च’ झटका

Patil_p

भाजपाच्या सुमन भंडारे पंचायत समितीच्या सभापती

Sumit Tambekar

पुण्यातील वीजयंत्रणेला ‘निसर्ग’चा धक्का, जिल्हा अंधारात

datta jadhav

कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

दिल्लीत 4,263 नवे कोरोना रुग्ण; 36 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!