Tarun Bharat

”#राष्ट्रीयबेरोजगारदिवस हॅशटॅग चर्चेत”

“मोदी हे तरुणांना बेरोजगार बनवणारे पंतप्रधान”

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यावर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी शुभेच्छा वर्षाव केला आहे. देशातुन तसेच परदेशातुन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी आजचा दिवस युथ काँग्रेसकडून आणखी एका निमित्ताने चर्चेत आणला आहे. नरेंद्र मोदींचा ७१ वा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

१७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भातील आवाहन काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांकडून गुरुवारपासूनच केली जात होती. त्याचा परिणाम आज म्हणजेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत असून #राष्ट्रीयबेरोजगारदिवस या हॅशटॅगमध्ये मोठ्या प्रमाणात युवक ही सहभागी झाले आहेत.

अशा प्रकारे भाजपाकडून २१ दिवसांचं अभियान सुरु करण्यात आलं आहे या अभियानाला विरोध करण्यासाठी युथ काँग्रेसकडून ही मोहीम हाती घेण्यात आलीय. याच्यात युथ काँग्रेस भाजप सत्तेवर आल्यापासुन नकारात्मक निर्णय नागरिकांन समोर ठेवले जाऊन नागरिकाना भाजपच्या नकारात्मक बाजुंमध्ये प्रामुख्याने बेरोजगारीसारखा मुद्दा मोदींच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आणला जातोय.

Related Stories

पुणे महानगरक्षेत्रात कोरोनाबाधितांवर 19 रुग्णालयात उपचार

datta jadhav

मंत्री बाळासाहेब पाटील मुंबईमध्ये दाखल

Patil_p

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी;ट्विट करत दिली माहिती

Abhijeet Khandekar

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा 10 राज्यांना अलर्ट

datta jadhav

अनलॉकचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; राज्य सरकारचे स्पष्टीकरण

Tousif Mujawar

खराब गालिचे, सुताच्या उत्पादनांपासून बनणार टाईल्स

Patil_p