Tarun Bharat

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वर्ल्ड कॉम्बीट मार्शल आर्ट सुपर कराटे क्लबचे यश

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

हैदराबाद, तेलंगना येथे झालेल्या नवव्या खुल्या राष्ट्रीय कुंग-फू आणि कराटे स्पर्धेत बेळगावच्या वर्ल्ड कॉम्बीट मार्शल आर्ट्स आणि सुपर कराटे संघटनेच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत भारतातील महाराष्ट्र, दिल्ली, पुणे, मुंबई, चेन्नई, पटणा व कर्नाटक येथील जवळपास दोन हजारहून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता.

बेळगावच्या 40 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश संपादन केले आहे. त्यामध्ये अभि कांबळे, ओमकार राजवीर गडकरी, भौतिक, सुमित गणमुखी, श्रीनिधी गणमुखी, दर्शन हावळ, सृष्टी हावळ, दीपक अथणी, चैतन्यसिंग पटेल, अरबाज सुभेदार, तेजस सपकाळ या सर्वांनी सुवर्णपदक पटकाविले तर आशुतोष बिजगर्णीकर, आशिष, अमृता हावळणकर, प्रिती मठपती, स्नेहा पटेल, संदीप राठोड, पुन्नय्या हिरेमठ, सलमान बेग यांनी रौप्यपदक पटकाविले. स्नेहल घेवारी, आकांक्षा गवस, श्रीवर्धनी, चंद्रीका वाल्मिकी यांनी कांस्यपदक पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते सर्वांना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व कराटेपटूंना ग्रँडमास्टर महेंद्र एस. एम., प्रणय महेंद्रकर, मा. सुनित महेंद्रकर, प्रज्ञा महेंद्रकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Stories

अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

बसुर्ते क्रॉस-बेकिनकेरे रस्ताकामाला सुरुवात

Amit Kulkarni

व्ही.एस.पाटील हायस्कूल मच्छेमध्ये शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

कुर्ली ते नृसिंहवाडी पायी दिंडीचे प्रस्थान

Patil_p

हिरेबागेवाडी येथील मनोरुग्णाला मिळाला आधार

Amit Kulkarni

‘त्या’ दगावलेल्या जनावरांना गंभीर आजार

Amit Kulkarni
error: Content is protected !!