Tarun Bharat

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सातारच्या खेळाडूंचा झेंडा

प्रतिनिधी / सातारा :

पुण्यातील निगडी येथे झालेल्या आंमत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सातारच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या खेळाडूंनी तुफान कामगिरी करत काता आणि कुमिते या दोन्ही प्रकार खेळाडूंनी 33 सुवर्ण, 30 रौप्य, 25 कांस्य पदके पटकावत सातारचा झेंडा फटकावला. या स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव कोरत 21 हजार 500 रुपयांचे बक्षिसही पटकावले. या यशाबद्दल या खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

ही स्पर्धा चॅम्पियन्स कराटे कल्ब, महाराष्ट्र यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये महाराष्ट्राबाहेरील विविध ठिकाणांहून, तसेच देशांतर्गत मध्य प्रदेश, गुजरात, दिव दमन अशा विविध ठिकाणहून 500 पेक्षा आधीक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

यामध्ये साताऱयातील 74 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन चॅम्पियन्स कराटे कल्बचे संस्थापक सिहांन संतोष मोहिते यांनी केले होते तर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शुटर दादि चंद्रो तोमर आणि शेफाली तोमर यांची उपस्थिती लाभली. या यशाबद्दल चॅम्पियन्स कराटे कल्बच्या सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार सातारा जिल्हा महिला व बालविकास कल्याण अधिकारी रोहिणी ढवळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यशस्वी खेळाडूंना चॅम्पियन्स कराटे कल्बचे संस्थापक सिहान संतोष मोहिते,   सेन्संई तमन्ना रिनवा सिकेसि सिईओ, सेन्संई निकिता सोनकटाळे चॅम्पियन्स कराटे कल्ब, साताराच्या हेड कोच, सेन्संई जय पवार, चिफ इंस्ट्रक्टर यांचेही मार्गदर्शन लाभले.  क्रेजी क्रिएशनच्या प्राध्यापिका आदिती घोलप यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Related Stories

वेग मंदावला; पण बाधित वाढ सुरूच

datta jadhav

गुटखा वाहतूक करणाऱ्या गाडीसह बारा लाखाचा ऐवज जप्त

Archana Banage

भूविकास बँकेतील कर्जदारांचे कर्ज माफ

datta jadhav

मराठा आरक्षण : उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे दोघांची रणनीती ठरली

Archana Banage

मराठमोळे मल्ल निघाले जग जिंकायला!

Patil_p

मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपाचा शंखनाद

Patil_p