Tarun Bharat

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मठ गावातील ५० जणांचा प्रवेश

Advertisements

वेंगुुर्ले- प्रतिनिधी:-

वेंगुर्ले तालुक्यातील मठ वडखोल येथील सुमारे 50 जणांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ओम स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
  यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, प्रांतिक सदस्य दादा परब, माfहला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, वेंगुर्ले शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समिर वंजारी, सच्चीदानंद बुगडे, वेंगुर्ले महिला शहर अध्यक्ष कृतिका कुबल, माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, सेवादल तालुकाध्यक्ष विजय खाडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते ललीतकुमार ठाकूर, अमोल ठाकूर, माजी सभापती प्रफुल्ल उर्फ बाळू परब, खाडे आदींसह मठ वडखोल पंचक्रोशीतील ग्रामस्थ व माfहला उपस्थित होत्या.
 यावेळी महादेव निवजेकर, निकिता निवजेकर, दीक्षा पालव, हेमंत नाईक, मधुकर निवजेकर, दिनेश पालव, शैलेश राऊळ, प्रदीप निवजेकर, संकेत निवजेकर, तेजस निवजेकर, शंकर निवजेकर, रामचंद्र राऊळ, महादेव गावडे, रोहन गावडे, प्रतिभा निवजेकर आदींसह सुमारे 50 जणांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी साक्षी वंजारी, समिर वंजारी, दादा परब व बाळा गावडे यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार आत्माराम उर्फ दादा सोकटे यांनी केले. 

Related Stories

जिल्हय़ात आणखी 17 रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

जिह्यात चाचण्या घटल्या; 623 नवे रूग्ण

Patil_p

सिंगापूरमधील डिजिटल चौकोनाला रामरक्षेचे कवच…!

Patil_p

जिल्हय़ासाठी मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा 21 हजार लसीचे डोस

NIKHIL_N

गादी विक्री दुकानात भीषण आग

Patil_p

आंबे खा अन् कर्करोग पळवा!

Patil_p
error: Content is protected !!