Tarun Bharat

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लांची चंदेरी कामगिरी

प्रतिनिधी / औंध

नोएडा ( उत्तरप्रदेश ) येथे सुरू असलेल्या ६५ व्या वरीष्ठ पुरुष  फ्रीस्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुरज कोकाटे ( 61 किलो ) आणि पृथ्वीराज पाटील (92 किलो) यांनी पहिल्याच दिवशी चंदेरी कामगिरी बजावत महाराष्ट्राला दोन पदके मिळवून दिली. मात्र त्यांचे सुवर्णपदक थोडक्यात हुकल्यामुळे कुस्ती शौकिनांनी हळहळ व्यक्त केली.

६५ व्या वरिष्ठ पुरुष फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आज महाराष्ट्र संघातील ६१ किलो वजनगटात  सुरज कोकाटे याने धडाकेबाज कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली होती. सेनादलाचा रवींद्र अंतिम फेरीत त्याला भारी ठरल्याने त्याचे सुवर्णपदक हुकले. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक जिंकलेला सुरज यंदा आपल्या पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी झाला. तो अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे सराव करीत आहे. ९२ किलो गटात पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) याने सुद्धा उत्तर भारतातील मल्लांच्या तगड्या आव्हानाचा सामना करीत अंतिम धडक मारली होती.

परंतु अंतिम फेरीत रल्वेच्या परविन कडून त्याला पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तो कोल्हापूरच्या शाहुपुरी तालमीत जालिंदर आबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आहे. लॉकडाऊन काळात लग्नाच्या बेडीत अडकलेला मूळचा कोल्हापूरचा मात्र सेनादलाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सोनबा गोंगाने निगवे खालसा ता करवीर याने 61 किलो गटात कास्यपदक जिंकून यशस्वी पुनरागमन केले आहे.

जागतिक पथक विजेता नरसिंग यादव याने विजयी सलामीने सुरवात केली मात्र त्याला पदकाने हुलकावणी दिली.कोल्हापूरचा विजय पाटील याला देखील पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रीय स्पर्धेसाठी उपस्थित असलेले कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, विजय बराटे दत्ता माने, ललित लांडगे यांनी विजयी मल्लांचे कौतुक केलं आहे.

Related Stories

जयंत पाटलांनी तरूणपणातील ‘तो’ फोटो शेअर करत जागवल्या गृहमंत्र्यांसोबतच्या आठवणी

Archana Banage

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात; 3 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

भय इथले संपत नाही….

Patil_p

वाई येथील रामडोह आळीतील डोहात एक जण बुडाला

Kalyani Amanagi

सातारा : डबेवाडी हद्दीत उसाचा ट्रॅक्टर घसरला, चालक जखमी

datta jadhav

सातारा : वाई नगरपालिकेचे आणखी ६ कर्मचारी पॉझिटिव्ह

Archana Banage