Tarun Bharat

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पूर्णिमा हैदराबादला कास्य

कर्नाटक येथील ज्युनियर वुमन व सब ज्युनियर कॅडेट गर्ल नॅशनल फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा

प्रतिनिधी / कोल्हापूर

बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या कर्नाटक येथील ज्युनियर वुमन व सब ज्युनियर कॅडेट गर्ल नॅशनल फ्रीस्टाईल स्पर्धेत कोल्हापूरच्या पूर्णिमा हैदराबादने कास्य पदकाची कमाई केली. यामुळे महिला कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
महिला कुस्तीपटू पूर्णिमा ही कोल्हापूरातील राष्ट्रकुल कुस्ती संकुलची खेळाडू आहे.

तिने बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा दि. 19 व 20 मार्च 2021 रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये पूर्णिमावे 4 राऊंड जिंकले. चौथ्या राऊंडमध्ये पूर्णिमाने चंदीगडची स्वेच्छा चौहाण हिला चितपट करून ब्रॉंझपदक पटकावले. पूर्णिमा ही राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते व आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक राम सारंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

Related Stories

‘मतदान ओळखपत्र-आधार लिंक’साठी मोबाईल नाही अनिवार्य

Archana Banage

बालिंगेत विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी कोरोना बाधित

Archana Banage

कोल्हापुरात शिवभोजन थाळी योजनेला प्रारंभ

Archana Banage

वरसोली येथे पॅरासेलिंग अपघात ; दोन महिला बचावल्या

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कळंब्यातील जुगार अड्यावर छापा ; शस्त्रासह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

Archana Banage