Tarun Bharat

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात गेल्या वर्षी ४८ हजार लोकांनी गमवाला जीव

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशात वाहनांच्या संख्येबरोबरच अपघातांची संख्याही जास्त आहे. २०२० मध्ये एक्सप्रेसवेसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुरुवारी संसदेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

दरम्यान, लोकसभेत लेखी उत्तर देताना, मंत्री नितीन गडकरी म्हणाले की २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३,८७२ लोकांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मोबाईल फोनचा वापर इत्यादींचा समावेश होतो.

Related Stories

ढबू मिरचीची महाराष्ट्र, बिन्सची बेंगळूरहून आवक

Patil_p

विधानपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेस समबल

Patil_p

अनियमितता मान्य केल्याबद्दल संचालकांचे आभार

Abhijeet Khandekar

‘लेदर’ नाही, आता ‘प्लेदर’

Patil_p

योगी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Tousif Mujawar

लष्करप्रमुख नरवणे लडाख दौऱयावर

Omkar B