Tarun Bharat

राष्ट्रीय महामार्ग लुटारूंसाठी राजमार्ग

Advertisements

तस्कर, लुटारू पुन्हा सक्रिय : सोने-चांदीचे दागिने, रोकड वाहतूक करणारी वाहने लक्ष्य : अमली पदार्थांची तस्करी निरंतर सुरूच

प्रतिनिधी /बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा तस्करांसाठी खुला झाला आहे. या मार्गावर अमलीपदार्थांची तस्करी निरंतर सुरू असते. कधी तपास यंत्रणेला चकवून तर कधी त्यांना हाताशी धरून तस्कर आपला कार्यभार उरकत असतात. मध्यंतरी कर चुकविण्यासाठी सोन्या-चांदीची वाहतूक करणाऱयांसाठीही हा मार्ग राजमार्ग ठरला होता. यातून गुन्हेगारीही वाढीस लागली होती. आता पुन्हा महामार्गावर तस्करीचे प्रकार सुरू झाले आहेत.

कोल्हापूरहून केरळकडे निघालेली बोलेरो पिकअप अडवून मोठी रक्कम लुटण्यात आली आहे. या घटनेमुळे तस्कर आणि दरोडेखोर यांच्या कारवाया सामोऱया आल्या आहेत. भाजीच्या पेटमधून मोठय़ा प्रमाणात चलनी नोटांची वाहतूक करण्यात येत होती. पिस्तूल व इतर शस्त्रांचा धाक दाखवून अर्टिगा कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी रोकड पळविली आहे.

खरेतर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. एम. के. हुबळीजवळ बोलेरो पिकअप अडविण्याचा प्रयत्न झाला. पाठलाग करून बैलहोंगलला जाण्याच्या मार्गावर रोकड लुटली आहे. दोन दिवसांनंतरही याप्रकरणी एफआयआर दाखल झाला नाही. बेळगाव शहर व जिल्हा पोलिसांना या प्रकरणाची माहिती असली तरी अद्याप तक्रारच दाखल झाली नाही तर आम्ही काय करू शकतो? या भूमिकेत पोलीस यंत्रणा आहे.

राष्ट्रीय महामार्ग, तस्कर व पोलीस यंत्रणा दहा महिन्यांपूर्वी ठळक चर्चेत आली होती. संकेश्वर, यमकनमर्डी, हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात हायवे रॉबरी किंवा दरोडेप्रकरणी एफआयआरही दाखल झाले आहेत. अनेक पोलीस अधिकाऱयांना हे प्रकरण शेकले आहे. 6 जून 2021 रोजी संकेश्वर पोलीस स्थानकात 4 किलो 972 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाला.

सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक नरसिंहमूर्ती यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. गेल्या एक वर्षापासून सीआयडीचे अधिकारी याप्रकरणाचा तपास करीत आहेत. बेळगाव उत्तर विभागाचे तत्कालिन पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांची उचलबांगडी झाली. गोकाक, हुक्केरी, यमकनमर्डी पोलीस स्थानकातील अधिकारी व पोलिसांवरही कारवाई झाली.

पोलीस अधिकाऱयांचाही सहभाग

आता तरी असे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा होती. महामार्गावर तस्कर आणि दरोडेखोर यांच्यातील खेळ थांबले नाहीत. ते पुन्हा सुरू झाले आहेत, हे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोठय़ा लुटीवरून स्पष्ट झाले आहे. कर चुकविण्यासाठी टोलनाके चुकवत आडमार्गाने येणाऱया व्यावसायिकांची वाहने अडवून त्यांच्याजवळील सोने-चांदीचे दागिने, रोकड पळविण्यात बेळगावपासून हुबळी-धारवाडपर्यंतच्या अनेक पोलीस अधिकाऱयांचाही सहभाग होता. हे प्रकरण सीआयडीने हाती घेतले त्यावेळी अधिकाऱयांचे धाबे दणाणले होते.

वरिष्ट पातळीवरूनच तपासाची गती धिमी

आपल्याच अधिकाऱयांची धरपकड झाली तर पोलीस दलाचे मनोधैर्य खचणार, सर्वसामान्य नागरिकांमध्ये खात्याची प्रतिमा मलीन होणार म्हणून वरिष्ट पातळीवरूनच तपासाची गती धिमी करण्यात आली. नहून अनेक अधिकारी उघडे पडले असते. आता शुक्रवारी सकाळची घटना लक्षात घेता कोल्हापूरहून बोलेरो पिकअपचा पाठलाग करत पिकअपमधील रोकड पळविण्यात आली आहे.

सोने चोरीप्रकरणी हुबळी येथील किरण वीरनगौडर (वय 37) या युवकाला सीआयडीच्या अधिकाऱयांनी अटक केली होती. अद्याप चोरीचे दागिने जप्त झाल्यासंबंधी कसलीच माहिती सीआयडीकडून मिळाली नाही. महामार्गावर करबुडवू पाहणाऱया व्यावसायिकांची वाहने अडवून त्यांची लूट करणाऱया टोळीत पोलीस अधिकाऱयांचाही सहभाग असल्याचे एक वर्षापूर्वीच उघडकीस आले आहे.

9 जानेवारी 2021 रोजी रात्री हत्तरगी टोलनाक्मयाजवळ कार अडवून 4 किलो 972 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविल्याचा प्रकार घडला होता. तब्बल सहा महिन्यांनंतर या प्रकरणी एफआयआर दाखल झाला.

फिर्याद दिली तरच कारवाई करू शकतो…

तस्कर व कर बुडविण्यासाठी आडमार्गाने वाहतूक करणाऱयांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणारे अधिकारीच दरोडेखोरांच्या भूमिकेत वावरू लागले आहेत. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर बेळगाव परिसरात अशा घटनांची पुन्हा पुनरावृत्ती सुरू झाली आहे का? पोलीस अधिकारी, त्यांचे दलाल सक्रिय झाले आहेत का? असा संशय बळावत चालला आहे. वरि÷ पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता शस्त्रांचा धाक दाखवून ज्यांची रक्कम चोरण्यात आली आहे, त्यांनी फिर्याद दिली तरच आम्ही पुढील कारवाई करू शकतो. मात्र, फिर्याद देण्यास विलंब का होतो आहे? हे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Stories

परिवहनची चाके हळूहळू मार्गावर

Amit Kulkarni

लष्करी जवानाच्या खून प्रकरणी पत्नीसह दोघांना अटक

tarunbharat

एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे भाषा

Patil_p

भाडे थकल्याने बस नियंत्रण कक्षाला टाळे

Amit Kulkarni

कोथिंबीरसह अन्य भाज्यांच्या दरात वाढ

Amit Kulkarni

बलोगा येथे लाखो रुपयांच्या बैलगाडा शर्यतीला प्रारंभ

Omkar B
error: Content is protected !!