Tarun Bharat

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला उद्यापासून साताऱ्यात सुरुवात

गोडोली /प्रतिनिधी : 

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उद्यापासून (दि.18) 32 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू होत आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या हस्ते या अभियानाचा सकाळी 11 वाजता शुभारंभ होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले. 

सुरक्षित वाहतूक व्यवस्था प्रबोधनासह विविध उपक्रम रस्ता सुरक्षा अभियान दरम्यान राबविण्यात येतात. यावर्षी कोरोनाच्या महामारीने अनेक निर्बंध लागू पडल्याने तसेच  संसर्ग आटोक्यात आला असला तरी पूर्ण मोकळीक नाही. शासकीय नियमांचे पालन करत यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे.

सोमवार दि. 18 रोजी सकाळी 11 वा. या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

सातारा जिल्हा बँक सहकार पॅनेलच्या नेतृत्वाखाली कायम राहील

datta jadhav

ठेकेदाराच्या प्रतिकात्मक पुतळय़ाची गाढवावरुन धिंड

Amit Kulkarni

सातारच्या आर्याचा आंतरराष्ट्रीय ठोसा

Patil_p

शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

सातारा जिल्ह्यात 122 नागरिकांना आज डिस्चार्ज; 465 नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

‘इन्स्पायर अवॉर्ड’ नामांकनात सातारा प्रथम

Archana Banage