Tarun Bharat

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आता ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश

सांगली प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यामध्ये १७ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा न्यायालय सांगली व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या अन्य प्रकरणांबरोबरच ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ही आता राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार १२ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाईची, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १८ खालील प्रकरणे, ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बँक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकील, पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती काळजी घेवून उपस्थित रहावे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले यांनी केले आहे.

Related Stories

Google ने केलं कॉफी एस्प्रेसो मशीन्सच्या जनकाला अभिवादन

Kalyani Amanagi

सांगली : आंबेगावात कोरोना बाधित रुग्ण, संपूर्ण गाव बंद

Archana Banage

ॲट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा : अप्पर जिल्हाधिकारी कदम

Archana Banage

अभिनेता पूरब कोहली सह पत्नी व मुलांना कोरोनाची लागण

prashant_c

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

Archana Banage

Sambhaji raje Chhatrapati Live : आमचा सरळ आणि थेट विषय सकल मराठा समाजाला न्याय -खासदार संभाजीराजे छत्रपती

Archana Banage