Tarun Bharat

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

पुढील वर्षीपासून कर्नाटकात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली.एनईपी न्यू इंडियाच्या संकल्पनेचा मार्ग प्रशस्त करेल, असेही ते पुढे म्हणाले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

एनईपी २०२० लागू करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने आपला अहवाल मंत्रिमंडळात मंजूर केला आहे. एनईपीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या संरचनात्मक आणि प्रशासकीय सुधारणांचा विचार केला जाईल. एनईपीच्या अंमलबजावणीसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल. शाश्वत विकास केवळ शिक्षणाद्वारे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

बेंगळूर : संपावरून बीएमटीसीकडून कर्मचाऱ्यांवर कारवाई

Archana Banage

कर्नाटकात १ सप्टेंबरपासून दररोज पाच लाख जणांचे होणार लसीकरण: मुख्यमंत्री

Archana Banage

केएलएसच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लॉ स्कूल, बेंगळुर येथे पटकावले प्रथम पारितोषिक

mithun mane

मणिपाल-एमआयटीत आणखी ७२ जणांना कोरोना, एकूण संख्या ३७१ वर

Archana Banage

काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईलींसह २० साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार

Archana Banage

भाजप सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा उचांक : शिवकुमार

Archana Banage