Tarun Bharat

राष्ट्रीय स्पर्धेत सुदेष्णा कांस्य पदकांची मानकरी

प्रतिनिधी/ सातारा

लहान गटापासून धावणे क्रीडा प्रकारात सातत्याने यश मिळवत राज्यस्तरावर दहा वेळा सुवर्ण पदके पटकावणाऱया जावली एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकर हिने पुणे येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदकांना गवसणी घातली होती. त्यामुळे तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. तिने आता नुकत्याच भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावत सातारकरांची मान उंचावली आहे.

पुण्यात तिने दोन सुवर्ण पदके पटकावल्याने तिची दि. 25 रोजी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दि. 25 झालेल्या 18 व्या राष्ट्रीय ज्युनिअर फेडरेशन कप 2021 मध्ये 100 मीटर धावणे क्रिडा प्रकारात कांस्य पदक मिळवले आहे. सुदेष्णा शिवणकर हिने वयाच्या 18 व्या वर्षात नुकतेच पदार्पण करत असताना तब्बल दोन मोठा वयोगट असणाऱया 20 वर्ष वयोगटात खेळत भोपाळ (मध्य प्रदेश ) येथे दि. 25 ते 27 जानेवारी दरम्यान झालेल्या 18 व्या राष्ट्रीय ज्युनिअर फेडरेशन कप 2021 मध्ये 100 मीटर धावणे क्रिडा प्रकारात कांस्य पदक मिळवले आहे.  दोन वर्षाच्या मोठय़ा गटात खेळत असताना अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. तिला तिचे मार्गदर्शक कोच बळवंत बाबर व यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालाचे प्राचार्य जाधव सर व गुजर सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

दि. 6 फेब्रुवारी रोजी गुहाटी (आसाम) येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. साताऱयात सध्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने सराव करणे अत्यंत अवघड होत आहे. तरीही या जावली एक्सप्रेसने राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक पटकावत अप्रतिम कामागिरी केली आहे. या यशाने जिल्हय़ाच्या क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

एसटी संपामुळे सातारा विभागाला 20 कोटींचा फटका

datta jadhav

घटनादुरुस्ती हाच शेवटचा पर्याय

Archana Banage

‘कब तक छिपोगो गोहातीमे; आना ही पडेगा चौपाटी में…’

datta jadhav

दहा महिन्यांपासून सातारा तालुका हॉटस्पॉट

Amit Kulkarni

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोरोनाचे दोन बळी

Archana Banage

बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Archana Banage