Tarun Bharat

राष्ट्रीय हॉकी हंगामाला ऑक्टोबरमध्ये प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2021 च्या हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय हॉकी हंगामाला ऑक्टोबर महिन्यात प्रारंभ होणार आहे. गेल्या मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे राष्ट्रीय हॉकी हंगामातील स्पर्धा तहकूब कराव्या लागल्या होत्या.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीय पुरूष आणि महिला संघांच्या दर्जेदार कामगिरीमुळे हॉकी इंडियाने या खेळाला आता पहिले प्राधान्य दिले आहे. विविध राज्यातील हॉकी संघटनाना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करत स्पर्धा घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. या हंगामातील पहिली स्पर्धा भोपाळमध्ये सुरू होईल. भोपाळमध्ये हॉकी इंडियाची पहिली उपकनिष्ठ पुरूष अकादमी राष्ट्रीय स्पर्धा 4 ते 13 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाईल. मध्यप्रदेशच्या हॉकी हंगामाला 18 ऑक्टोबरपासून प्रारंभ केला जाईल. 11 वी कनिष्ठांची महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा झारखंडमधील सिमडेगा येथे ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे 11 वी हॉकी इंडियाची वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा झांशीमध्ये ऑक्टोबर महिन्यात खेळविली जाणार आहे.

Related Stories

स्विटोलिना, केर्बर, कोंटा पराभूत

Patil_p

भारत-श्रीलंका दुसरी टी-20 लढत आज

Patil_p

प्रो लिग कबड्डी स्पर्धेसाठी 5-6 ऑगस्टला लिलाव

Patil_p

सेरेनाकडून व्हिनस पराभूत

Patil_p

शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा रोमांचक विजय

Patil_p

चहापानाअखेर इंग्लंड 36 धावांनी आघाडीवर

Patil_p