Tarun Bharat

रास दांडियामध्ये थिरकली तरुणाई

Advertisements

बेळगाव : रिमझिम पावसातही रास दांडियामध्ये पारंपरिक गुजराथी गाण्यांवर तरुणाई थिरकत होती. गोमटेश विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पारंपरिक वेश परिधान करून तरुण-तरुणी गरब्याचा आनंद घेत आहेत.

विविध संघटनांच्या सहयोगाने गोमटेश विद्यापीठाच्या मैदानावर दांडियाचे आयोजन केले आहे. येथे दांडियासोबतच आकर्षक असे सेल्फी पॉईंट तयार केले असून या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गर्दी होत आहे. उत्कृष्ट दांडिया खेळणाऱयांना पारितोषिक दिले जाणार असल्याने रंगतदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. एकीकडे रिमझिम पाऊस सुरू असताना दुसरीकडे तरुणाईचा उत्साह दिसून आला.

Related Stories

विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाई

Patil_p

कर्ले-बेळवट्टी गावांचा संपर्क अखेर तुटलाच

Amit Kulkarni

पहिल्या रेल्वेगेटचे दुसऱया टप्प्यातील काम सुरू

Amit Kulkarni

खानापूर-मुडेवाडी-हत्तरगुंजी रस्त्याची अवजड वाहनांमुळे दुर्दशा

Omkar B

रायगड येथील सुवर्ण सिंहासनासाठी 5001 चा धनादेश सुपूर्द

Amit Kulkarni

आता प्रत्येक तालुक्यातच कोरोना रुग्णांवर उपचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!