Tarun Bharat

राहुल गांधींकडून केंद्र सरकार लक्ष्य

नोकरीच नसल्याने रविवार अन् सोमवार सारखाच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारवर शरसंधान केले आहे. केंद्रातील भाजपच्या शासनामुळे वीकली ऑफ आणि वर्किंग डे याच्यातील फरकच संपला आहे, कारण ‘नोकऱयाच नाहीत’ असे  राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे. त्यांनी ट्विटर अमेरिकेची प्रमुख कारनिर्माता कंपनी फोर्डकडून भारतातील उत्पादन बंद करण्याच्या घोषणेसंबंधीच्या एका वृत्ताला टॅग केले आहे.

भाजप सरकारचा ‘विकास’ असा की रविवार-सोमवारचा फरकच संपला आहे. नोकऱयाच नसल्याने रविवार अन् सोमवार एकच असे राहुल यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी राहुल यांनी शनिवारी देशातील शेतकऱयांच्या स्थितीवरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते.

एका वृत्ताचा दाखला देत त्यांनी देशातील शेतकऱयांचे उत्पन्न नव्हे तर कर्ज वाढल्याचा दावा केला होता. देशाचे पोट भरणारा जेव्हा स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरू शकत नसल्यास काय करणार असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले.

3 सप्टेंबर रोजी राहुल यांनी बेरोजगारीवरून केंद्रातील रालोआ सरकारला लक्ष्य केले होते. केंद्र सरकार बेरोजगारीवर उपाययोजना करू इच्छित नाही. पीएसयू विकू नका, एमएसएमईना आर्थिक मदत द्या असे म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

Related Stories

बिल्किस बानोची याचिका फेटाळली

Patil_p

भारतात इस्रायली नागरिकांवर हल्ल्याचा धोका

Patil_p

देशात पहिले कोरोना टेस्टिंग किट तयार

datta jadhav

बेपत्ता झालेल्या ‘त्या’ पाच तरुणांना चीन आज भारताच्या हवाली करणार

datta jadhav

दिलासादायक! दिल्लीत मागील 24 तासात 648 नवे कोविड रुग्ण

Tousif Mujawar

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ‘वॉरियर आजीं’ना मदत

Tousif Mujawar