Tarun Bharat

राहुल गांधींना निवडून देणे केरळच्या जनतेची घोडचूक

 ऑनलाईन टीम / कोझिकोड :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निभाव लागणे अशक्य आहे. त्यामुळे केरळच्या जनेतेने त्यांना का निवडून दिले?, असा सवाल करत राहुल गांधींना निवडून देणे ही केरळच्या जनतेची घोडचूक असल्याचे मत प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले आहे.

केरळच्या कोझिकोड येथे आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलला संबोधित करताना गुहा बोलत होते. गुहा म्हणाले, राहुल गांधी हे पाचव्या पिढीतील राजकारणी आहेत. ते सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत. मात्र, सध्याचा यंग इंडिया त्यांना स्विकारायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेपुढे त्यांचा निभाव लागू शकत नाही. त्यामुळे केरळच्या जनेतेने त्यांना का निवडून दिले? का राहुल गांधींना संसदेत पाठविले? असा प्रश्न गुहा यांनी उपस्थित केला.

तसेच राहुल गांधींना निवडून देऊन केरळच्या जनतेने मोठी घोडचूक केली. त्यामुळे मल्याळम जनतेने 2024 मध्ये राहुल गांधींना निवडून देण्याची चूक करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

Related Stories

महाराष्ट्र राज्यात पोलीस दलात 12,538 जागांसाठी भरती : अनिल देशमुख

Tousif Mujawar

नसिरुद्दीन शाहंच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल

prashant_c

नवी मुंबई : एपीएमसी मार्केट 11 मे पासून पूर्ण बंद

Tousif Mujawar

पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी गृहमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

Tousif Mujawar

AAIB करणार केरळ विमान अपघाताचा तपास

datta jadhav

चोरांवर दोन दगड पडले तर तळमळ मळमळ कशाला?

datta jadhav