Tarun Bharat

राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले

Advertisements

नवी दिल्ली/प्रतिनिधी

दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. भेटीनंतर राहुल गांधी यांनी एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमुळे राहुल गांधींवर टीका करण्यात येत होती. तसेच एका वकिलाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनतर अखेर ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ते ट्विट हटवलं आहे.

दरम्यान राहुल गांधींनी पीडितेच्या कुटुंबाची भेट त्यानंतर त्यांनी या पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्याला भाजपनेही आक्षेप घेतला होता. तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्याने या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे ट्विट हटवण्यात आलं आहे.

नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Related Stories

‘कृषी सन्मान’चे दोन हजार आज शेतकऱयांच्या खात्यात

Amit Kulkarni

पंतप्रधान मोदी स्वतःच करताहेत सर्वेक्षण

Amit Kulkarni

उत्तराखंडमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 2984 वर 

Tousif Mujawar

मालवण जेटीचे उदघाटन व बंदर विकासासाठी निधी द्यावा ; आ. वैभव नाईक यांची दादा भुसेंकडे मागणी

Anuja Kudatarkar

दहा उद्योगक्षेत्रांना दोन लाख कोटी

Omkar B

माझे इंग्रजी उत्तम नाही!

Patil_p
error: Content is protected !!