Tarun Bharat

राहुल गांधी यांच्या अमेठीतील कार्यालयावर छापा

ऑनलाईन टीम अमेठी 

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातील  जनसंपर्क कार्यालयावर रविवारी रात्री छापा घालण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील मदत साहित्याची तपासणी करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार, काही अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने राहुल गांधी यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तेथील मदत साहित्याची तपासणी केली. या प्रकरणी काँग्रेसकडून स्थानिक भाजप खासदार स्मृती इराणी यांनी लक्ष्य करण्यात आले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या प्रकराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. 

यानंतर विधान परिषद सदस्य दिपक सिंह यांनी ट्विट करत स्मृती इराणी वर तोफ डागली आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, स्मृतीजी तुम्ही फार मोठी चूक करत आहात. स्वतः तर मंत्रालयाकडून अमेठीला काही दिले नाही. जर राहुल आणि प्रियांका मदत करत आहेत तर त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले जात आहेत.

अमेठीतील जनता काँग्रेससाठी परिवाराप्रमाणे आहे आणि हे साहित्य त्यांच्यासाठी आहे, असं ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

Related Stories

कोडोलीत तरूणाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

लोकांसमोर अपमान केल्यासच तो गुन्हा

Patil_p

57 कैद्यांची जामिनावर मुक्तता

Patil_p

अमेरिकेकडून लष्करी ड्रोन निर्यातीचे निकष शिथिल

datta jadhav

म्हैसूरमधील ज्युबिलीयंट फार्मा कंपनी हॉटस्पॉट

Patil_p

महापालिका पूर्णपणे स्वायत्त; आमचा कोणावरही दबाव नाही

datta jadhav