Tarun Bharat

राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले विविध क्षेत्रातील मान्यवर

पुणे /प्रतिनिधी

बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे वयाच्या 83 वर्षी पुण्यात शनिवारी निधन झाले. बजाज यांना न्यूमोनिया आणि हृदयाची समस्या होती, त्याच्यावर गेल्या एक महिन्यापासून पुण्यातील रुबी क्लिनिक रुग्णालयात उपचार चालू होते. रविवारी सकाळी आकुर्डी, पिंपरी चिंचवड येथील बजाज कंपनीत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. बजाज कंपनीच्या हजारो कामगारांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

यावेळी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांच्यासह अनेकांनी भेट देऊन आदरांजली वाहिली.आज दुपारी 3 वाजता त्यांचे पार्थिव पुण्यात आणले असून सायंकाळी 5 वाजता नानापेठ येथील वैकुंठ धाम येथे शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

Related Stories

कॅनडाच्या पंतप्रधान निवासाला 50 हजार ट्रक चालकांनी घेरले

datta jadhav

आयात उमेदवारामुळे भाजपमध्ये खदखद

Archana Banage

महिला, बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे

datta jadhav

कोट्यावधीचा निधी पण हवा शुद्ध होणार कशी?

Archana Banage

टीव्हीवर उद्यापासून `माझी शाळा मालिका’

Archana Banage

रामाच्या गोटात मोबाईल टॉवर उभारण्याला विरोध

Patil_p