Tarun Bharat

रा. शि. गोसावी कलानिकेतनच्या कलाकृती प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रतिनिधी/कोल्हापूर

रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील फौंडेशन, अप्लाईड आर्ट तसेच आर्ट टीचर डिप्लोमा वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कलानिकेतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे यांचे हस्ते झाले.

प्रदर्शनात 200 विद्यार्थ्यांच्या 300 कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाचे खास वैशिष्टय़ म्हणजे हस्तकलाकृतीसोबत डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यावसायिक दृष्टीकोनातून केलेल्या कलाकृती मांडल्या आहेत. मेमरी, कम्पोझिशन, व्यक्तिचित्रणांपासून ते जाहिरात क्षेत्रामध्ये केली जाणारी विविध डिझाईन्स, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, टायपोग्राफी, इलस्ट्रेशन याद्वारे विविध माध्यमात व वेगवेगळया विषयांसाठी केली जाणारी डिझाईन्स या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

तसेच या वर्षीचे राज्य कलाप्रदर्शन औरंगाबाद येथे सुरू असून यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या 58 कलाकृतींची निवड करण्यात आली आहे.

यावेळी विश्वस्त विजयमाला मेस्त्राr, प्रेमला भोसले, रघुनाथ जाधव, प्राचार्य सुरेश पोतदार, अमृत पाटील, अजित दरेकर, विजय टिपुगडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. मनोज दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनुराधा क्षीरसागर हिने केले. निवेदिता काटकर, सोनाली नावडकर यांनी मनोगत व्यक्त केली. प्रा. वैशाली पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

शाळेतील प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

Archana Banage

सुरुपलीत गॅस सिलेंडरचा स्फोटात घर जळून खाक

Archana Banage

कोल्हापूर : चोरीप्रकरणी इचलकरंजीतील माजी नगरसेवक पोलिसांच्या रडारवर

Archana Banage

सावे लैंगिक अत्याचार प्रकरण; आमदार कोरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Archana Banage

राज्यातील पहिली साऊंडप्रुफ शुटिंग रेंज दुधाळीत

Archana Banage

कोल्हापूर : वळीवडेत गावठी दारूसाठा जप्त; तरुणावर गुन्हा

Archana Banage