Tarun Bharat

रिकार्डो डिसोझा यांच्याकडून टिटो क्लब विकल्याची घोषणा

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

गोव्यातील जगप्रसिद्ध क्लब म्हणून नावलोकिक असलेला बागा(कळंगूट) येथील ‘टिटो क्लब’ विकल्याची घोषणा उद्योजक रिकार्डो जोजफ डिसोझा उर्फ रिकी यांनी केली. सरकारी यंत्रणांच्या छळामुळे क्लबसह गोव्यातील टिटोचे सर्व उद्योग विकण्यात आल्याचे रिकी यांनी जाहीर केले आहे.

सोमवारी सायंकाळी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून रिकी डिसोझा यांनी ही घोषणा केली आहे. टिटो क्लबची स्थापना 1971 मध्ये रिकार्डो यांच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर हा व्यवसाय रिकार्डो व त्यांच्या भावाने वाढवून टिटो नावाचा ब्रॅण्ड जागतिक पातळीवर नेला. शिवाय गोव्यातही टिटोने स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये केला होता. टिटो क्लब हा गोव्यात येणाऱया देशी-विदेशी पर्यटकांसाठी नाईटलाईफ व पार्टीचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जात होते. आता हा क्लब विकण्यात आला आहे. आपण यापुढे गोव्यात कोणताच उद्योग सुरू करणार नाही असे मालक रिकी यांनी स्पष्ट करतानाच आपल्या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

प्राप्त माहितीनुसार रिकार्डो डिसोझा हे विदेशात स्थायिक होण्याची शक्यता आहे. हा क्लब गोव्यातील सर्वात लोकप्रिय असा क्लब होता. जगभरातून येणाऱया सर्वच पर्यटकांसाठी आकर्षण असलेला टिटो क्लब आता उत्तर भारतातील एका व्यावसायिकाने विकत घेतला आहे.

खरेदी करणारे कसिनो किंग असल्याची माहिती

दैनंदिन व्यवहारात लाखो करोडोंची उलाढाल होत असलेल्या येथील टिटो आस्थापन खरेदी करण्यास पुढे आलेले हरयानातील राजकीय प्रस्थ असलेले कसिनो कींग असल्याची पुसटशी माहिती हाती लागली आहे. मुळ बामणवाडा-शिवोली येथील रहिवासी असलेल्या रिकार्डो डिसोझा यांची पाश्वभूमी धनाढय़ भाटकारशाही घराण्याशी संबंधित असून त्यांना दोन तरूण मुले व पत्नी आहे. रिकार्डोची पत्नी परदेशी असल्याने त्यांचा गोव्याप्रमाणेच इंग्लंड तसेच बैंकोक शहरात व्यवसाय आहे. शिवोलीतील गरीब गरजुंसाठी दयावानची भूमिका बजावणाऱया रिकार्डोनी अंदाजे तीस ते पस्तीस वर्षाआधी बागा कळंगूट येथील एका गल्लीत स्वतःचे रेस्टॉरंट थाटले होते. पर्यटकांना नियमीतपणे मनोरंजन, नृत्य आणि खाद्यपदार्थाची मेजवाणी देणाऱया टिटोजने अल्पकाळातच देश विदेशात आपले नाव अजरामर केले होते. कळंगूट-बागा येथील टिटो लेन म्हणजे देश विदेशातील तरुणाईला पडलेले एक सप्तरंगी स्वप्नच होते आणि आजही आहे. दरम्यान पंचायत पातळीपासून ते नगर नियोजन प्राधिकरण आणि गटविकास कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पैशांच्या मागणीवरून आपल्याला हैराण करण्यात येत असल्याने आपण नाईलाजाने टिटोज विक्रीचा निर्णय घेतल्याचे रिकार्डो यांनी यासंबंधात संकेत स्थळावर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे.

Related Stories

उमेश तळवणेकर यांचा पेडणे मगो मंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा

Amit Kulkarni

मडगाव शहरात भिकाऱयांचा प्रश्न ऐरणीवर

Patil_p

नवरात्रोत्सव बंद करण्याचा आदेश मामलेदारांनी तत्काळ मागे घ्यावा

Amit Kulkarni

फोंडा पालिकेतर्फे विकासकामांना गती

Amit Kulkarni

आरोपी गुल्शन गुसाई याला कोठडीत ठेवण्याचा आदेश

Patil_p

‘रेमेडियल क्लास’ 200 तास घ्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!