Tarun Bharat

रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्था सलाईनवर

गटशिक्षणाधिकारी सह केंद्र प्रमुखांच्या सर्व जागा रिक्त, विद्यार्थ्यांचे भवितव्य रामभरोसे

प्रतिनिधी/पन्हाळा

पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षणविभागातील विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत. यामध्ये ज्या  पदावरुन सर्व तालुक्याच्या शिक्षणाचा गाडा हाकला जातो ते गटशिक्षणधिकारी पद रिक्त आहे. शिवाय तालुक्यातील सर्व 18 केंद्र प्रमुखांच्या जागासह मुख्याध्यापक, अध्यापक, पदवीधर शिक्षकांच्यासह आदी विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याचा शिक्षण विभाग सलाईनवरच असल्याचे सध्याचे चित्र आहे. यागंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले असले तरी मुले शाळेत येण्याआधी ही सर्व पदे भरण्याची गरज आहे. अन्यथा आधीच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांचे भवितिव्य रामभरोसेच असुन यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या शासनाच्या धोरणानुसार अद्याप तरी शाळा सुरु करण्यासंदर्भात ठोस अशा निर्णय झालेला नाही. सध्या नवीन शेक्षणिक वर्ष शाळेतील घंटा वाजल्याविना व विद्यार्थ्यांच्या किलबिलाशिवाय सुरु झाले आहे. त्यामुळे या प्रश्नांचे गांभीर्य आता जरी समोर येत नसले तरी ज्यावेळी मुलांना शाळेत येण्याची परवानगी मिळाली त्यावेळी रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी हेळसांड होणार नाही असे म्हणणे कठीण बनले आहे. पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक कमी असल्यामुळे शाळा खऱ्याअर्थाने सुरु झाल्यातर उपलब्ध शिक्षकाचे समोजन कसे करायचे हे दिव्य पार करण्यासाठी मोठी कसरत होणार यात शंका नाही.

बहुतांश शाळांमध्ये कमी शिक्षकांवरच पन्हाळा तालुक्याचा शिक्षणाचा भार गेली अनेक वर्षापासुन पडला असुन,ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. दुर्गम आणि वाड्या-वस्त्यांवर विखुरलेल्या पन्हाळा तालुक्यातील भावी पिढीला शिक्षणापासुन वंचित रहावे लागणार का ? असा प्रश्न भेडसावत आहे.

पन्हाळा तालुक्यात गटशिक्षणधिकारीच्या पदासह, विस्तार अधिकारी 2, केंद्र प्रमुखाच्या 18, मुख्याध्यापक 9, पदवीधर 29, अध्यापक 36, अशा एकुण 95 पदे रिक्त आहेत. शिवाय पन्हाळा गटशिक्षणधिकारी कार्यालयातील परिचर 2, कनिष्ठ अभियंता 1, लेखालिपीक 1, साधन व्यक्ती4, विशेष फिरती शिक्षक 2, अधिक्षक 1 अशी कार्यालयातील देखील 10 जागा रिक्त आहेत. सध्या पन्हाळा गटशिक्षणधिकारी पद रिक्त असुन याठिकाणी विस्तार अधिकारी म्हणुन गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले व अनुभवी  ए.एम.आकुर्डेकर यांच्याकडे गटशिक्षणधिकारी या पदाचा प्रभारी कार्यभार आहे. त्यांना विस्तार अधिकारीसह तालुक्याच्या गटशिक्षणधिकारी या महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळावी लागत असल्याने त्यातच केंद्र प्रमुखांच्या सर्वजागा रिक्त असल्याने त्यांची दमछाक होत आहे.

सद्य स्थितीत जरी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु झाले नसले तरी येणाऱ्या काळात शिक्षकांना एकाचवेळी अनेक वर्गाला अध्यापन करावे लागणारआहे. सध्या कोरोनामुळे कामाला उसंत मिळालेली  असली तरी पुन्हा आहे त्या परिस्थितीत काम सुरु झाले तर अन्य कार्यालयीन कामावरही ताण पडणार आहे. यामुळे भविष्यात शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याबाबीकडे आता वेळ आहे तो पर्यंत गंभीरपणे लक्ष देऊन रिक्त रदे भरणे गरजेची बनली आहेत.

दरम्यान, याबाबत माजी सभापती व विद्यामान सदस्य प्रुथ्वीराज सरनोबत यांनी पन्हाळा तालुक्यात शिक्षण विभागाला शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Related Stories

स्वतंत्र पाटबंधारे खाते अन् 80 हजार एकर जमिनीला पाणी !

Abhijeet Khandekar

लॉकडाऊनमध्ये म्हासुर्लीच्या राजू सुतारने बनविले मळणी मशीन

Archana Banage

महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश करण्यासाठी कोणताही प्रस्ताव नाही : शरद पवार

Abhijeet Khandekar

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा अत्याधुनिक वॉर्ड

Archana Banage

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही त्वरीत धान्य द्या – खासदार मंडलिक यांची मागणी

Archana Banage

दिवाळी खरेदीचा सुपर संडे

Patil_p