Tarun Bharat

रिक्षा चालकांना खासदारांचा मदतीचा हात

प्रतिनिधी / वैभववाडी:

खासदार विनायक राऊत यांच्यावतीने वैभववाडी येथील सहा आसनी रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. तालुक्यात सुमारे 100 जणांना वाटप करण्यात आले.

खासदार राऊत यांच्यावतीने जिह्यातील सहाआसनी रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तुंच्या एक हजार किटचे वाटप शिवसेनेच्यावतीने करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून वैभववाडी येथील 80 रिक्षा चालक व अन्य 20 अशा 100 लोकांना हे किट वाटप करण्यात आले.

 यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, सिनेमा दिग्दर्शक दीपक कदम, स्वप्नील धुरी, महेंद्र रावराणे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड-दोन महिने लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या रिक्षा व सलून व्यावसायिकांवर कठिण प्रसंग ओढवला आहे. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून खासदार राऊत यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जिह्यात सुरू केले आहे.

Related Stories

सक्षम कारणावरच गोव्यात प्रवेश

NIKHIL_N

गरीब शेतकऱयाचे वीजबिल तब्बल 32 हजार

Patil_p

‘जैतापूर’साठी तांत्रिक पायाभरणी सुरू

Patil_p

कोलगाव सोसायटी चेअरमनपदी भाजपाचे वीरेंद्र धुरी तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेचे थॉमस डिसोजा

Anuja Kudatarkar

गोळवण कृषी सहाय्यकाची आत्महत्या

NIKHIL_N

मालवणात चोऱ्यांचे सत्र सुरूच

Anuja Kudatarkar