Tarun Bharat

रिक्षा चालकास लुटणारा जेरबंद

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा  

तीन अनोळखी इसमांनी रिक्षा भाडय़ाने करण्याचा बहाणा करुन रिक्षाचालक सिराज अब्दुल कादर बागवान (रा. यादोगोपाळपेठ) यांना कोडवे (ता. सातारा) च्या हद्दीत रात्री 11.35 वाजण्याच्या सुमारास लुटले. आरोपींनी रिक्षाचालक बागवान यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केले होते व रिक्षाचालकाचे खिशातील मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम व रिक्षाचालकाची रिक्षा  असा एकुण 76,000 किंमतीचा ऐवज जबरदस्तीने लुटुन नेला होता. या प्रकरणी तीन इसमांपैकी शाहूपुरी पोलिसांनी एक संशयिताला अटक केली आहे. रॉबरीचा गुन्हा शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने तीन दिवसात उघड केला आहे. 

  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी घटनेचे अनुषंगाने त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आज दि. 12 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, रिक्षाचालकास मारहाण करून लुटल्याचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार विपुल तानाजी नलवडे (वय 21 रा. पिलेश्वरीनगर) याने साथीदारांसह केला आहे. तो सैदापुर कॅनॉल परिसरात फिरत आहे. ही माहिती प्राप्त होताच शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने विपुलचा सैदापुर कॅनॉल परिसरात शोध घेण्यास सुरवात केली. तेव्हा विपुल हा पोलिसांना पाहून पळून जावू लागला. म्हणून गुन्हे पथकाने त्याचा कॅनॉलचे परिसरात पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्हय़ाचे अनुषंगाने विचारपुस केली. यावेळी त्याने हा गुन्हा त्याचे दोन साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली. त्याच्या दोन्ही साथीदारांचा शोध सुरू असून सदरचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यास दाखल असल्याने जबरी चोरीतील संशयित विपुल नलवडे याला पुढील कार्यवाहीसाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

  ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेड कॉन्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्टेबल सचिन पवार यांनी केली आहे.

Related Stories

वायसीच्या विद्यार्थ्यांची फी माफी बाबत प्राचार्यांना निवेदन

Patil_p

कोल्हापूर :मराठा आरक्षणावर घटनापीठापुढे सुनावणी घ्यावी

Archana Banage

Satara : हॉटेलमध्ये मांस विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड; पालिकेची कारवाई

Abhijeet Khandekar

सायकल चोराकडून 18 सायकली हस्तगत

datta jadhav

”उंच गुढ्यांमध्ये एक गुढी करोनामुक्तीच्या विजयाचीही असो”

Archana Banage

नाशिकमध्ये बंद गाळ्यात आढळले मानवी अवयव

datta jadhav
error: Content is protected !!