Tarun Bharat

रिक्षा व्यावसायिकांनी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत – पालकमंत्री

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्यसरकारच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना पंधराशे रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनुदान मिळवण्यासाठी रिक्षाचालकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात येऊन आपले ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने परवानाधारक रिक्षा व्यवसायिकांना पंधराशे रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे मंगळवारपासून रिक्षाचालकांसाठी नोंदणी सुविधा सुरू करण्यात आली.

यासाठी रिक्षाचालकांनी वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर.सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष येऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यावर रिक्षा चालकांना खात्यात तत्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, अशी माहिती नामदार सतेज पाटील यांनी दिली.

यावेळी दिपक थोरात, ऋषिकेश पाटील, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, सचिन चावरे, आनंदा करपे, अक्षय शेळके, उदय पवार, विनायक पाटील, सुदर्शन तुळसे, जिल्हा सचिव संजय पवार- वाईकर, आदी उपस्थित होते.

Related Stories

धुरांडी पेटणार; कोल्हापुर जिल्ह्यात गळीत हंगामाची लगबग झाली सुरु

Archana Banage

साखर निर्यात बंदी निर्णय शेतकरी व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा- राजू शेट्टी

Archana Banage

कोल्हापुरात देसाई यांच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पुन्हा हल्ला: कार पेटवत केली प्रचंड तोडफोड

Archana Banage

प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील

Archana Banage

खाजगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी

Archana Banage

कोल्हापूर : महापौर शिवसेनेचाच, निवडणूक ताकतीने लढवणार- राजेश क्षीरसागर

Archana Banage
error: Content is protected !!