ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, गुरुवारी पतधोरण जाहीर केले. त्यात सलग दुसऱयांदा रेपो रेट 5.15 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्के एवढा कायम ठेवला आहे. सहाव्या द्वि-मासिक पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय आज जाहीर केला.
चालू आर्थिक वर्षातील हा सहावा पतधोरण आढावा आहे. पतधोरण आढाव्यात चलनवाढीचा दर आटोक्मयात असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.