Tarun Bharat

रिझवान, ब्यूमाँट वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

वृत्तसंस्था/ दुबई

2021 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीच्या टी-20 प्रकारात पुरूष विभागात पाकचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवान आणि महिलांच्या विभागात इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट यांची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.

2021 च्या क्रिकेट हंगामात टी-20 या अतिजलद प्रकारात पाकच्या मोहम्मद रिझवानने 134.89 स्ट्राईक रेट राखत 73.66 धावांची सरासरी राखली. तर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू ब्यूमाँटने 2021 च्या कालावधीत टी-20 प्रकारात 29 सामन्यात 1326 धावा जमविल्या असून ती सर्वाधिक धावा जमविणाऱया क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱया स्थानावर आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पाकच्या मोहम्मद रिझवानचे यष्टीरक्षण दर्जेदार झाले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 प्रकारात आपले पहिले शतक झळकविले. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रिझवान सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजीच्या यादीत तिसऱया क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत भारताविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात रिझवानने 55 चेंडूत नाबाद 79 धावा झळकविल्या होत्या. महिलांच्या विभागात इंग्लंडच्या ब्यूमाँटने न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत 102 धावा जमवित मालिकावीराचा बहुमान मिळविला. तसेच तिने भारताविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकविले होते.

Related Stories

सेरेना उपांत्यपूर्व फेरीत, गॉफ पराभूत

Patil_p

रियल माद्रिद कोपा डेल रे स्पर्धेत विजेता

Patil_p

युक्रेनची यास्त्रेम्स्का दुसऱया फेरीत

Patil_p

भालाफेकपटू सुमित अंतिलने जिंकले दुसरे सुवर्ण

Patil_p

महिला हॉकीत नेदरलँड्सला चौथ्यांदा सुवर्ण

Patil_p

भारताचे पाच मुष्टीयोद्धे उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!