Tarun Bharat

रिफायनरीसाठी आरामको बांधिल

बी. अशोक यांचा विश्वास

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सुमारे 44 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचा रत्नागिरी रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी सौदी अरेबियाची आरामको कंपनी बांधिल असल्याची भूमिका प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. अशोक यांनी घेतल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आह़े 

हा प्रकल्प कोणत्याही अन्य भारतीय प्रकल्पाशी परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने स्पर्धा करत नाह़ी स्वतःच्या गुणवत्तेवर हा प्रकल्प उभा आह़े  चांगल्या परताव्याच्या आधारे गुंतवणूक आकर्षित करून घेण्याची क्षमता या प्रकल्पात आह़े हा प्रकल्प 60 दशलक्ष टन एवढय़ा प्रमाणात दरवर्षी प्रुड तेलाची उलाढाल करेल़ या प्रकल्पाला लगेच आर्थिक पुरवठय़ाची गरज नाह़ी सौदीच्या आरामको कंपनीने 50 टक्के गुंतवणूक करण्याचे मान्य केले होत़े उर्वरित भाग इंडियन ऑईल, बीपीसीएल, एचपीसीएल यांनी उभारण्याचे ठरवले आह़े संयुक्त अरब अमिरातीच्या ऍडनॉक या कंपनीकडूनही रत्नागिरी रिफायरी प्रकल्पात गुंतवणूक करण्यात येईल़, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सौदीच्या आरामको कंपनीने 15 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे समभाग रिलायन्स इंडस्ट्रीकडून विकत घेण्याचे ठरवले आह़े याशिवाय बीपीसेएल या कंपनीत गुंतवणूक करण्याचेही प्रस्तापित झाले आह़े सौदी आरामकोला भारतात अन्य ठिकाणी गुंतवणूक संधी असल्या तरी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पात त्यांची गुंतवणूक सुरू राहिल़ हा प्रकल्प 2022 पर्यंत कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले होते, असे रत्नागिरी रिफायनरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. अशोक यांनी सांगितल़े

Related Stories

तिनशे फूट दरीत कार कोसळून चालक ठार

Abhijeet Khandekar

सैनिकांचं गाव….चौकुळ!

Anuja Kudatarkar

दापोलीत ‘ड्राय-रन’चा शुभारंभ

Archana Banage

रत्नागिरी : ‘कळंबणी’तील अधिपरिचारिका अन्यत्र वर्गचा आदेश अखेर रद्द

Archana Banage

गडगडाटासह अनेक भागात पाऊस

NIKHIL_N

ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत आर्यन गावडे आणि ऋतुजा परब प्रथम

NIKHIL_N