Tarun Bharat

रिफायनरी समर्थकांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्यास खासदारांचा नकार

Advertisements

   राजापूर  

तालुक्यातील नाणार समर्थकांनी खासदार विनायक राउढत यांच्याकडे मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याबाबत केलेल्या मागणीसंदर्भात खासदार राऊन यांनी सपशेल हात वर करत मुख्यमंत्र्याची भेट घ्यावयाची असेल तर तुमच्या आमदारांना सांगा, ते  तुमची भेट घालून देतील, असे सांगितल्याने रिफायनरी समर्थकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रिफायनरी प्रकल्प समर्थकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची आहे. ही भेट घडवून द्या, अशी मागणी राजापूर तालुक्यातील विलये येथील प्रल्हाद तावडे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे केली होती. त्यावेळी राऊत यांनी तुम्ही थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना मेसेज करा. ते तुम्हाला अपॉईटमेंट देतील किंवा तुम्ही आमदारांकरवी त्यांची भेट घ्या. आपण तुमची भेट घडवून देऊ शकत नाही, अशी कबुली दिल्याची माहिती तावडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना तुम्ही थेट पत्रही पाठवू शकता ते पत्र वाचतात अथवा मेल करा वा आमदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घ्या, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केल्याचे प्रल्हाद तावडे यांनी सांगितले.

रिफायनरी प्रकल्प समर्थकांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी भेट घडवून देण्यात खासदार विनायक राऊत यांनी उघडपणे असमर्थता दर्शवली आहे. एवढेच नव्हे तर आमदारांकरवी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा सल्ला खासदार राऊत यांनी दिल्याची माहिती प्रकल्प समर्थक नेते प्रल्हाद तावडे यांनी पत्रकारांना दिली. याबाबतचे राऊत यांच्याशी झालेले थेट संभाषणच त्यांनी ऐकवले.

प्रकल्प समर्थकांनी काही महिन्यांपूर्वी प्रकल्प भागातील साडेआठ हजार एकरांची समंतीपत्रे जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सादर केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत राजापूरच्या दौऱयावर आलेल्या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या राऊत यांनी संमतीपत्रांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासाठी प्रतीक्षा करा, असे वक्तव्य केले होते. आता मात्र प्रकल्प समर्थकांची आपण मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देऊ शकत नाही, अशी स्पष्ट कबुली खासदार राऊत यांनी दिल्याने मतदारसंघातील प्रकल्प समर्थकांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठीची भीस्त आता केवळ आमदार राजन साळवी यांच्यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

.

Related Stories

रत्नागिरी : दापोली-खेड मार्गावर अपघात, विद्यापीठ कर्मचारी ठार

Abhijeet Shinde

जिल्हय़ात कोरोनाचा वेग मंदावला

NIKHIL_N

केंद्रीय पथकाकडून ‘निसर्ग’ग्रस्त दापोलीची पुन्हा पाहणी

Abhijeet Shinde

रत्नागिरी : हुतात्मा अनंत कान्हेरे पुतळा चौकाला चढला नवा साज

Abhijeet Shinde

कासारी येथे मासेमारीसाठी गेलेले दोघे बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

Abhijeet Shinde

रत्नागिरी : संजय राऊत यांनी विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त करावी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!