Tarun Bharat

रियलमी 7 5जी स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था / बिजींग

चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपला नवा रियलमी 7 5जी स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. आपल्या 7 सिरीजच्या फोनचा विस्तार करण्याहेतू कंपनीने आपला फोन प्रथम युरोपियन बाजारात लाँच केला आहे. सदर फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येणार असून ज्याची किंमत 27 हजार 400 रुपये असणार आहे. 27 ते 30 नोव्हेंबरच्या कालावधीत ब्लॅक फ्रायडे सेलवर ऑफरअंतर्गत हा फोन खरेदी करायला गेल्यास तो सवलतीत 22 हजार 500 रुपयांना मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रियलमीने ब्लॅक फ्रायडे सेलसाठी ऍमेझॉनसोबत करार केला असून यांच्या पोर्टलवर अधिकृतरित्या सदरचा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही सांगितले जाते. 6.5 इंचाची फुल एचडी डिस्प्ले स्क्रीन असणाऱया या फोनला समोर सेल्फीसाठी 16 एमपीचा कॅमेरा असणार आहे. तर बॅटरी 5 हजार एमएएचची असणार आहे. जलदगतीने चार्ज होणारे तंत्रज्ञान या फोनमध्ये असणार आहे.

Related Stories

निस्सानच्या कार उत्पादनात होणार घट

Patil_p

यस बँकेला 151 कोटीचा नफा

Patil_p

आठ दिवसांचा तेजीचा प्रवास अखेर थांबला

Patil_p

गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढली

Patil_p

डीएलएफने विकले 551 मजले

Patil_p

ओप्पोचे मागच्या आर्थिक वर्षात मोठे नुकसान

Patil_p