Tarun Bharat

रियल माद्रिदकडे सुपर कप

वृत्तसंस्था/ रियाध, सौदी अरेबिया

येथे झालेल्या सामन्यात ऍथलेटिक बिलबावचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून रियल माद्रिदने 12 व्या वेळी स्पॅनिश सुपर कपचे जेतेपद पटकावले.

भक्कम खेळ करणाऱया रियल माद्रिदने सर्वच विभागात सरस कामगिरी करीत बिलबावला पराभूत केले. 38 व्या मिनिटाला मोड्रिकने माद्रिदचा पहिला गोल नोंदवल्यानंतर 52 व्या मिनिटाला पेनल्टीवर बेन्झेमाने दुसरा गोल केला. हीच आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत रियल माद्रिदने जेतेपद निश्चित केले.

पूर्वार्धात मोड्रिकने माद्रिदला आघाडीवर नेले. त्याने मारलेल्या जोरदार कर्लिंग फटक्यावर हा गोल नोंदवला. उत्तरार्धात पेनल्टी क्षेत्रात येरेच्या हाताला चेंडू लागल्याने व्हीएआरच्या माध्यमातून माद्रिदला पेनल्टी बहाल केली. त्यावर बेन्झेमाने अचूक गोल नोंदवला. 86 व्या मिनिटाला कुर्टोइसने रॉल गार्सियाची पेनल्टी अचूक थोपवली. कार्लो ऍन्सेलोटी रियल माद्रिद संघाचे पुन्हा प्रशिक्षक झाल्यानंतर संघाचे हे पहिलेच यश आहे. मोड्रिकला सामनावीराचा बहुमान मिळाला. आता हा संघ कोपा डेल रे स्पर्धेतील शेवटच्या सोळा फेरीतील सामना खेळणार आहे. ऍथलेटिक बिलबाव क्लबही या स्पर्धेत खेळणार असून सुपर कपमध्ये त्यांना तिसऱयांदा उपविजेतेपद मिळाले आहे.

Related Stories

आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू टोरेन्स कालवश

Patil_p

सायकलपटू इसो अल्बन उपांत्य फेरीत

Patil_p

कनिष्ठ कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये संजू देवी, भातेरी यांना रौप्यपदके

Patil_p

महिला नेशन्स कप हॉकीमध्ये भारत विजेता

Patil_p

Tokyo Olympics: भारतीय महिला हॉकी संघ विजयी

Archana Banage

पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात सोळा पदके

Patil_p