Tarun Bharat

रियल माद्रीदचा सामना बरोबरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ माद्रीद

ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात लेव्हान्टने बलाढय़ रियल माद्रीदला 3-3 असे गोलबरोबरीत रोखले. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात ऍटलेटिको माद्रीदने एल्चचा 1-0 असा पराभव केला.

रियल माद्रीद आणि लेव्हान्ट यांच्यातील सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. रियल माद्रीद संघातील गॅरेथ बेलने 2019 नंतर या स्पर्धेत आपला पहिला गोल नोंदविला. बेलने पाचव्या मिनिटाला रियल माद्रीदचे खाते उघडले. मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना लेव्हान्टने आपले खाते उघडत रियल माद्रीदशी बरोबरी साधली. लेव्हान्टचा हा गोल  रॉजेरने केला. 57 व्या मिनिटाला लेव्हान्टचा दुसरा गोल कॅपेनाने नोंदविला. 73 व्या मिनिटाला व्हिनीसियसने रियल माद्रीदचा दुसरा गोल केला. 80 व्या मिनिटाला लेव्हेंटीचा तिसरा गोल अल्बाने केला. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना व्हिनीसियसने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून हा सामना बरोबरीत राखला. दुसऱया एका सामन्यात ऍटलेटिको माद्रीदने एल्चवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. या सामन्यातील इकमेव गोल 39 व्या मिनिटाला अँजेल कोरियाने केला.

Related Stories

भारत-इंग्लंड यांच्यातील चेन्नईतील सामने प्रेक्षकांविना

Patil_p

भारताच्या सरिता मोरला रौप्यपदक

Patil_p

इंटर मिलान उपांत्यफेरीत

Patil_p

बाला देवी, मनीषा यांना एआयएफएफचे पुरस्कार

Patil_p

न्यूझीलंड क्रिकेट संघाचे लंडनला प्रयाण

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!