Tarun Bharat

रिलायन्स रिटेलसोबतचे व्यवहार थांबले!

Advertisements

रिलायन्स रिटेलसोबतचे व्यवहार थांबले!, मागील 44 दिवसात उभारले 47,265 कोटी रुपये

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स समूहाचा प्लॅटफॉर्म रिलायन्स रिटेल वेंचर्स आता कोणत्याही प्रकारची हिस्सेदारी विकणार नाही. सध्याच्या कालावधीचा हिस्सेदारी विक्रीचा टप्पा तरी पूर्ण झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने मागील 44 दिवसांमध्ये 10.09 टक्के हिस्सेदारी विक्रीमधून 47,265 कोटी रुपये उभारले आहेत.

रिलायन्स रिटेलमध्ये पहिली हिस्सेदारी ही 25 सप्टेंबर 2020 रोजी विकली आहे. सिल्वर लेक पार्टनर्सने 1.60 टक्क्यांची हिस्सेदारी जवळपास 7,500 कोटी रुपयांना घेतली आहे. तसेच 9 ऑक्टोबर रोजी कंपनी आणि यांच्या अन्य गुंतवणूकदारांनी 0.40 टक्के हिस्सेदारी आणि खरेदी केली.  याच्यासाठी 1,875 कोटी रुपये दिले आहेत. सदर व्यवहारासह कंपनीने 9,375 कोटी रुपयांमध्ये 2 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे.

आता ध्येय ई-कॉमर्सचे

आता रिलायन्स समूह भारतीय उद्योग क्षेत्रात आपली स्थिती मजबूत करण्यासोबत रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेल त्यापाठोपाठ आता रिलायन्स ई-कॉमर्सवर लक्ष केंद्रीत करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ईशा अंबानी यांनी दिली.

Related Stories

युपीआयचे 223 कोटीहून अधिक व्यवहार

Patil_p

ऍमवेची 100 कोटींची गुंतवणूक

Patil_p

फ्रान्सच्या टोटलची ‘अदानी’त गुंतवणूक

Patil_p

सेन्सेक्स 1,345 अंकांनी मजबूत स्थितीत

Patil_p

गोएअरच्या स्वदेशी अभियानातून 50 हजार जण परतले मायदेशी

Patil_p

सेन्सेक्स निर्देशांक 1 हजार अंकांनी तेजीत

Patil_p
error: Content is protected !!