Tarun Bharat

रिसेकी, कॉलिन्स, टॉमलिजेनोव्हिक विजयी

वृत्तसंस्था/ मियामी

फ्लोरिडामध्ये शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या महिलांच्या मिनी टेनिस स्पर्धेत एकेरीत अमेरिकेच्या ऍलिसन रिसेकी, डॅनिली कॉलिन्स आणि ऑस्ट्रेलियाची टॉमलानोव्हिक यांनी विजय नोंदविले.

कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आपल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व टेनिस स्पर्धा रद्द किंवा लांबणीवर टाकल्या आहेत. चालू आठवडय़ात  डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या चार स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत टेनिस स्पर्धा घेतली जाणार नाही, असे सांगण्यात आले पण फ्लोरिडामध्ये महिलांची मिनी टेनिस स्पर्धा खेळविली जात आहे.

शुक्रवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या कॉलिन्सने आपल्याच देशाच्या ऍनीसिमोव्हाचा 4-1, 4-2 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टॉमलानोव्हिकने राऊंड रॉबिन फेरीच्या शेवटच्या सामन्यात रिसेकीचा 4-3, 4-1 असा पराभव केला. पण शुक्रवारच्या राऊंड रॉबिन सामन्यात रिसेकीने ऍनिसिमोव्हाचा 0-4, 4-0, 4-3 असा पराभव केला होता.

Related Stories

स्वीसच्या फेडररचे विजयी पुनरागमन

Amit Kulkarni

क्रीडा पत्रकार किशोर भिमानी कालवश

Patil_p

अँडरसनने अश्विन, बोथमला मागे टाकले

Patil_p

अचंता शरथ कमलला ‘खेलरत्न’ सन्मान

Patil_p

अँडी मरेचे विजयी पुनरागमन

Patil_p

बेंगळूरमध्ये नव्या क्रिकेट अकादमीचा शुभारंभ

Patil_p