Tarun Bharat

रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत कोरोना रुग्णाचा रस्त्यावरच मृत्यू ; आयुक्तांनी रूग्णाच्या कुटूंबियांची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी

बेंगळूर /प्रतिनिधी

कर्नाटकातील दक्षिण बेंगळूरच्या हनुमंतनगर येथे रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत एका कोरोना बाधित ६५ वर्षीय व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची दक्षत घेत आज शनिवारी ब्रुहत बेंगळूर महानगर पालीकेचे आयुक्त बी.एच. अनिल कुमार यांनी मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली.

शुक्रवारी या मृतांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यावेळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णाला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली. परंतु, जवळपास तीन तास ते रुग्णवाहिकेची वाट पाहत होते. यावेळी रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत होता. अचानक तो रस्त्यावर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. यावेळी रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आज आयुक्तांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन हात जोडून दिलगिरी व्यक्त केली.

Related Stories

जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा

Tousif Mujawar

‘बेड नाही’…चा फटका! हत्तरगी येथील वृद्धाचा मृत्यू

Patil_p

बेळगाव रेल्वे स्थानकाचा 170 कोटी निधीतून विकास

Patil_p

शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

Amit Kulkarni

भक्तिमार्गातून जीवन सार्थकी बनवा

Amit Kulkarni

लॉकडाऊन काळात दारू विकणाऱया युवकाला अटक

Amit Kulkarni