Tarun Bharat

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती : जुळय़ांना जन्म

आरोग्य कर्मचाऱयांच्या कामगिरीबाबत अभिनंदन : हॉस्पिटलमध्ये नेताना अस्नोडा येथे प्रसुती

प्रतिनिधी / वाळपई

वाळपई सामाजिक रुग्णालयातून म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात एका महिलेला प्रसुतीसाठी काल सोमवारी 108 रुग्ण्वाहिकेतून नेण्यात येत असताना वाटेत अस्नोडा येथेच ती प्रसूत होऊन तिने जुळय़ांना जन्म दिला. यावेळी तिच्या सोबत असलेल्या वाळपई सामाजिक रुग्णालयाच्या कर्मचाऱयांनी चांगली मदत केल्यामुळे तिची प्रसुती सुकर झाली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

वेळुस येथील 32 वर्षीय महिलेला सोमवारी सकाळी प्रसुतीसाठी वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिची प्रकृती थोडीशी गंभीर बनल्यामुळे तिला म्हापसा आझिलो इस्पितळात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 108 वाहनातून तिला नेण्यात येत असताना अस्नोडा येथे पोहोचताच तिच्या प्रसुतीच्या वेदना वाढल्या. यामुळे सोबत असलेल्या परिचारिका नली सावंत बांदेकर, सिमा परीट, श्रेतन कुडणेकर, व इतरांनी प्रसंगावधान राखून गाडीतच प्रसुतीची प्रक्रिया पूर्ण केली.

सदर महिलेने जुळय़ा मुलांना जन्म दिला. त्यावेळी उपस्थित कर्मचारी चांगल्या प्रकारची सेवा दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 108 वाहनात यापूर्वीही प्रसुती झालेल्या आहेत. मात्र जुळय़ा मुलांचा जन्म देण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे 108 सेवा गोव्यातील रुग्णासाठी फार महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. सध्या तिला म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, आतापर्यंत 108 सेवेने गोवेकरांना चांगल्या प्रकारची दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेवेमध्ये कार्यरत कर्मचारी पूर्णपणे ध्येयाने काम करीत असून या सेवेचा आतापर्यंत लाखो रुग्णांनी चांगला फायदा घेतलेला आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

तृणमूलच्या नेत्यांकडून आपल्याकडेही संपर्क

Amit Kulkarni

गढुळ पाण्याचा दाबोस शुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम

Amit Kulkarni

रविवारी तब्बल 64 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

वझरी येथे जलवाहिनी फुटून पाणी वाया

Omkar B

‘आयसीजीएस सच्चेत’ गस्ती जहाज देशाला समर्पित

Omkar B

काणकोणात भातशेतीच्या कामाला जोर

Amit Kulkarni