Tarun Bharat

रुग्णांनी भीती बाळगण्याचे कारण नाही

बेळगाव / प्रतिनिधी

केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात येत आहेत. मात्र, त्यांचा विभाग पूर्णत: वेगळा आहे. अन्य रुग्णांवर वेगळय़ा विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे या सर्वसामान्य रुग्णांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी कळविले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, मधुमेह, बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, श्वसन विकार, नाक, कान, घसा विकार, कर्करोग या विकारांनी त्रस्त असणाऱया रुग्णांवर निरंतरपणे स्वतंत्र विभागात उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित आणि सर्वसामान्य रुग्ण यांचे विभाग वेगळे असून, सर्वच रुग्णांची हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि डॉक्टर योग्य तऱहेने काळजी घेत आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णांनी कोणतीही भीती बाळगू नये, असेही हॉस्पिटलने स्पष्ट केले आहे.

Related Stories

रस्त्यावरील विद्युतखांब हटविण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

पर्यटनाला चालना मिळणार का?

Amit Kulkarni

पार्ट्या होतात मित्रांच्या, नाकीनऊ येतात शेतकऱ्यांच्या

Amit Kulkarni

वडगाव कृषी पत्तीनला 1 कोटीची पत

Omkar B

टेम्पररी वीजमीटरच्या वाढत्या तक्रारी

Patil_p

वृद्धांनी बजावला घरबसल्या मतदानाचा अधिकार

Omkar B