सोलापूर,प्रतिनिधी
रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णाला लागणारी औषधे रुग्णालयांनीच उपलब्ध करून द्यावेत, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणायला सांगू नयेत. शिवाय औषधांच्या किंमती शासनमान्य दरानेच कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा सुरळीत होण्यासाठी पुरवठादार यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शनिवारी आदेश काढून प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा या समितीत बदल करीत, काही नव्या नियमावली जाहीर केले आहेत. समितीचे अध्यक्ष निकम यांना बदलून त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची नियुक्ती केली आहे.
तक्रार असल्यास यांच्याशी करा संपर्क
अध्यक्ष भारत वाघमारे- 9850791111
डॉ. प्रदीप ढेले- 9423075732
डॉ. पुष्पा अग्रवाल- 9823373153
डॉ. शितलकुमार जाधव- 9403694080
डॉ . मिलिंद शहा- 9822096280
प्रदीप राऊत- 9987333415
नामदेव भालेराव- 9405783636


previous post