Tarun Bharat

रुद्रांक्ष पाटील मानांकन फेरीत दाखल

वृत्तसंस्था/ पुणे

येथे झालेल्या तिसऱया पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष विभागात दीपक रावतने तर महिलांच्या विभागात रेश्मा दत्तूने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये सुमारे 16,000 धावपटूंनी आपला सहभाग दर्शवला होता. पुणे हाफ मॅरेथॉनचे उद्घाटन भारताची माजी धावपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेती सुधा सिंगने ध्वज दाखवून केले.

पुरुषांच्या विभागासाठी 21 कि.मी. चा पल्ला आयोजित केला होता. दीपक रावतने 1 तास, 04.18 अवधी घेत प्रथम स्थान, दीपक कुंभारने 1 तास, 05.09 अवधी घेत दुसरे स्थान तर हुकूम सिंगने 1 तास, 06.28 अवधी घेत तिसरे स्थान मिळवले. महिलांच्या विभागासाठी 21 कि.मी. चा पल्ला ठेवण्यात आला होता. रेश्मा दत्तूने 1 तास 17.06 अवधी घेत प्रथम स्थान, नंदिनी गुप्ताने 1 तास 18.07 कालावधी नोंदवत दुसरे तर कविता यादवने 1 तास 19.52 अवधी घेत तिसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या 10 कि.मी. धावण्याच्या शर्यतीत रोहित वर्माने 30.06 मिनिटांचा अवधी घेत प्रथम स्थान, एस. बुगाताने 30.06 मिनिटांचा अवधी घेत दुसरे स्थान तर अंकित देसवालने 30.21 मिनिटांचा अवधी घेत तिसरे स्थान मिळवले. महिलांच्या 10 कि.मी. शर्यतीमध्ये शशिलता ठाकुरने 35.56 मिनिटांचा अवधी घेत पहिले, अर्पिता सैनीने 37.34 मिनिटांचा अवधी घेत दुसरे, तर ज्योती चौहानने 38.41 मिनिटांचा अवधी घेत तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांसाठी एकूण 28 लाख रुपयांची बक्षीसे देण्यात आली.

Related Stories

युपी योद्धाजकडून दबंग दिल्ली पराभूत

Amit Kulkarni

गर्ग, जयस्वाल, जुरेल यांची शानदार अर्धशतके

Patil_p

रणजी स्पर्धेच्या ड्रॉ मध्ये मुंबई, कर्नाटक, दिल्ली एकाच गटात

Patil_p

दीप्ती शर्माची टी-20 मानांकनात दुसऱया स्थानी झेप

Patil_p

मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची चार पदके निश्चित

Patil_p

पश्चिम विभाग संघाची जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p