अजय देवगणची पहिली वेबसीरिज
सुपरस्टार अजय देवगणचा बहुप्रतीक्षित क्राइम थ्रिलर ‘रुद्र ः द ऐज ऑफ डार्कनेस’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अजय या सीरिजमध्ये एक अंडरकव्हर पोलीस अधिकाऱयाच्या व्यक्तिरेखेत दिसून येतोय. सीरिज एक सायकोलॉजिकल क्राइम ड्रामा असल्याचे सांगण्यात येते.


या सीरिजमध्ये अजयसोबत ईशा देओल, राशी खन्ना, अश्विनी काळसेकर, अतुल कुलकर्णी, आशिष विद्यार्थी, मिलिंद गुणाजी आणि लूक केनी हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील. या सीरिजची निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टुडिओजने मिळून केली आहे. ही सीरिज लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकणार आहे. सीरिज हिंदीसोबत तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, मल्याळी आणि बंगाली भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
रुद्र ही वेबसीरिज 6 एपिसोड्समध्ये असणार आहे. जागतिक स्तरावर यशस्वी ब्रिटिश सायकोलॉजिकल क्राइम ड्रामा सीरिज ‘लूथर’चा हा हिंदी रिमेक असणार आहे. अजय देवगण याचबरोबर लवकरच ‘आरआरआर’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. तसेच ‘गंगूबाई काठियावाडी’, मे डे’, ‘मैदान’, ‘थँक गॉड’ या चित्रपटांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.